PRESS RELEASE

Pune - September 19, 2013

FOR IMMEDIATE RELEASE

वाचू ई-आनंदे - ‘स्कॅनक्राफ्ट’ स्कॅनर व पब्लिशिंग सॉफ्टवेअर द्वारे साहित्य जतन

आपल्या पूर्वजांनी अनेक महत्वाचे संदर्भग्रंथ, अभिजात साहित्यकृती, शास्त्रीय/उपशास्त्रीय लेख, काव्यरचना, नाटयकृती, निबंध अशा सर्वार्थांनी परिपूर्ण व गुरुसमान अशा  ग्रंथसंपदेचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे. अशा  बहुमुल्य ग्रंथांची आपण कितीही काळजी घेतली तरीही हवामानातील बदल, धूळ, वारंवार होणारी हाताळणी ह्या सर्वांचा एकत्रित दुष्परिणाम  ग्रंथांवर होत असल्यामुळे अशा बहुपुयोगी ज्ञानाचे आपण कशा रीतीने जतन करणार आहोत ही समस्या आपल्याला सतत भेडसावत असते. ह्या समस्येवर परिणामकारक उपाय म्हणुन ‘वेबजेनिक टेकनॉलॉजी सोल्युशन्स’ ह्या पुणे येथील संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात सक्रिय असलेल्या कंपनीने खास दुर्मिळ व अमुल्य पुस्तके यांचे जतन करण्यासाठी एका उच्च दर्जाच्या व सर्वार्थाने परिपूर्ण असा ‘स्कॅनक्राफ्ट’  (www.scancraft.in)  स्कॅनर आणि स्व-प्रकाशन सॉफ्टवेअर यांची निर्मिती केली आहे. ह्याचा उपयोग आपल्या ग्रंथसंपदेचा डिजिटल स्वरूपात परिवर्तन करण्यासाठी होतो व त्यामुळे ग्रंथसाठवणी किवां ग्रंथहाताळणी संदर्भात समस्या दूर होऊन त्यांचे दीर्घकाळ जतन होऊ शकते.

‘वेबजेनिक’ ने ह्या कामासाठी लागणारे सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर व स्कॅनरची निर्मिती आपल्या पुणे (महाराष्ट्र  राज्य) येथील कंपनीतच केली आहे. अशा प्रकारचा संपूर्ण भारतीय बनावटीचा व व्यावासिकदृष्ट्या उपलब्ध असलेला हा पहिला स्कॅनर असून आज पुण्यातच महाराष्ट्र शासनाच्या एका विभागामध्ये यशस्वीरीतीने उपयोगात आणला जात आहे. संपूर्ण विदेशी बनावटीचे काही स्कॅनर बाजारात उपलब्ध आहेत परंतु त्याच तोडीचा ‘स्कॅनक्राफ्ट’ स्कॅनर विदेशी स्कॅनर च्या तुलनेत अतिशय वाजवी किमतीत उपलब्ध आहे अशी माहिती ‘वेबजेनिक’ चे संस्थापक श्री दर्शन महाराणा यांनी दिली.

आपली पुस्तके / दस्तऐवज अतिशय अचूकपणे व कमीत कमी वेळात स्कॅन करण्यासाठी ह्यात उच्च दर्जाची कार्यक्षमता असणारे दोन कॅमेरे बसविले आहेत. तसेच इंग्रजी ‘व्ही’ (V) आकाराच्या दणकट व पारदर्शी होल्डर मुळे पुस्तक पुर्ण सुरक्षित राहते व व्यवस्थित सांभाळले जाते. ‘स्कॅनक्राफ्ट’ हा हाय-स्पीड बुक स्कॅनर (Dual Configuration Book Scanner) असून त्यावर दर महिना एक लाखाहून अधिक पाने सहजपणे स्कॅन होऊ शकतात हे यशस्वीरित्या सिध्द झालेले आहे.

आपली पुस्तके वा दस्तऐवज स्कॅन झाल्यावर PDF या सर्वाधिक वापरात असलेल्या फाईल च्या स्वरूपात तयार होतात.  ह्या PDF फाईल्स संग्रहित करणे (storing), त्या हव्या तेव्हां बिनचूकपणे शोधणे (searching), त्यांचे नियंत्रित रीतीने वितरण करणे (controlled distribution), त्या ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध करून देणे (online viewing) अशा व आणखी अनेक प्रगत वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी ज्या प्रकारचे सर्व्हर सॉफ्टवेअर लागते त्या प्रकारचे ‘वेबजेनिक पब्लिशिंग सर्व्हर’ हे स्व-प्रकाशन सॉफ्टवेअर सुध्दा ‘वेबजेनिक’ ने विकसित केलेले आहे.

‘वेबजेनिक पब्लिशिंग सर्व्हर’ हे सॉफ्टवेअर बहुद्देशीय (multi-purpose) असून व ‘स्कॅनक्राफ्ट’ स्कॅनर बरोबर किंवा स्वतंत्रपणे सुद्धा वापरता येतो. ह्याचा उपयोग पूर्णपणे नवीन डिजीटल पुस्तके (e-books) बनवणे, दस्तऐवज बनवणे व इंटरनेट वरून (किंवा इंट्रानेट वरून, फक्त ऑफिस साठी) वितरण करणे या सारख्या पेपरलेस ऑफिस साठी आवश्यक असलेल्या कामासाठी उत्कृष्ट रीतीने होऊ शकतो.

ज्या शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, बँका, रुग्णालये, वाचनालये, पोलीस व इतर शासकीय कार्यालये  यासारख्या संस्थांना आपली मुद्रित प्रकाशने आणि दस्तऐवज इतरांना खुल्या अथवा नियंत्रित रीतीने इंटरनेट वरून (किंवा इंट्रानेट वरून, फक्त ऑफिस साठी) उपलब्ध करून द्यायची आहेत, त्यांच्यासाठी ‘वेबजेनिक पब्लिशिंग सर्व्हर’ हे व्यापक वैशिष्ट्ये असलेले सॉफ्टवेअर उत्तम पर्याय ठरू शकते.

‘स्कॅनक्राफ्ट’ स्कॅनरसाठी वापरलेले अनेक सुटे भाग आवश्यक अशा संशोधनानंतर तसेच निर्मिती करताना सर्व स्तरांवर  अत्युच्च गुणवत्ता राखून करण्यात आलेले आहेत. तसेच केवळ हार्डवेअर व सॉफ्टवेअर उपलब्ध करून न देता आपली ‘ई लाईब्ररी’ यशस्वीरित्या उभी करण्यासाठी लागणारी सर्व सेवा आम्ही पुरवतो’ असे ‘वेबजेनिक’ कडून सांगण्यात आले.

हा ‘स्कॅनक्राफ्ट’ स्कॅनर इच्छूकांसाठी पुणे येथील ‘वेबजेनिक’ च्या कार्यालयात पूर्वनियोजित वेळ घेऊन पाहण्यासाठी व वापरून बघण्यासाठी उपलब्ध आहे.

याची अधिक माहिती आपणांस  www.scancraft.in तसेच www. webgenic.com या वेबसाईट्स वरून

मिळू शकते.

संपर्क,

वेबजेनिक टेकनॉलॉजी सोल्युशन्स

पहिला मजला, हिमगौरी अपार्टमेण्ट्स,

कर्वे रोड, कोथरूड,

पुणे, महाराष्ट्र ४११ ०३८

फोन : ०२०-२५४५-६३४७ (020-2545 6347)

मोबाईल : ९८९०६ २२९५० (98906 22950)

ई-मेल: contact@webgenic.com

वेबसाईट : www.webgenic.com, www.scancraft.in